Back to feed

होय! मलाही आकाश व्हायचय !

होय! मलाही आकाश व्हायचयं !

त्या आकाशाकडे पाहील आणि वाटल की किती मोठ आहे ना आकाश !

नंतर उमगलं की ते मोठ आकाश विचार करत सावकाश

मला ही त्या आकाशा सारख व्हायचय शांत आणि अनंत कितीही युगे आली-गेली तरी आकाश मात्र कायम जीवंत

आकाशाच किती बर आहे, मनात येईल तेव्हा पाऊस, ऊन एकदा मलाही असच स्वतंत्र जगायचय आकाश होऊन

मलाही आकाशासारखं नीळच व्हायचय !

या वासने‌च्या गोऱ्या रंगाला गमवायचयं

मान्य आहे मला, स्पर्श नाही करू शकत आकाशाला तो हक्क आहे फक्त प्रकाशाला.

त्याच आकाशात होणारा कडकडात मात्र सगळेच पाहतात पण कोण पाहत जेव्हा आकाशाचे अश्रू पाऊस म्हणून वाहतात

मलाही वाटत त्या आकाशासारख व्हाव. या सृष्टी ला स्वतः मध्ये सामावून जगाव.

हो मलाही या आकाशासारख जगायचयं या जगाला जवळून पाहायचय, आणि कोणाला आपल होणार दुःख न दाखवता रडायचय येणारी युगे पाहून आनंदी व्हायचय

होय मलाही आकाश व्हायचय !

Baatcheet