Back to feed

तिचं स्वप्न

ती चालली होती एका वाटेवर,

जिथं तिचं स्वप्न तिला हाक देत होतं,

माझ्या अस्तित्वाच्या सावल्या मागे,

तिचं आकाश मोकळं झेपावत होतं...

मी थांबलो, पाहत राहिलो...

मनात प्रेम, डोळ्यांत ओल, ओठांवर शांतता,

कारण प्रेम म्हणजे फक्त जवळ येणं नाही,

तर तिचं सुख मनापासून मानणं असतं.

तिला आवडतं जे,

ते तिला मनापासून करू द्यावं,

आपण का बंधनात ठेवावं?

प्रेम म्हणजे मुक्ती… कैद नाही!

मी झुरणार नाही,

मी लढणार आहे, माझ्या स्वप्नांसाठी,

तिच्या आठवणींना शक्ती मानून,

नव्या सूर्यासोबत पुन्हा उगम घेईन.

ती हरवली नाही,

ती माझ्या भावना समजली होती,

कदाचित तिचं उत्तर 'नाही' होतं,

पण तिच्या मौनातही आदर होता…

प्रेमात हरलो नाही मी,

मी स्वतःला पुन्हा गवसवतोय,

ती तिच्या स्वप्नात मग्न आहे,

आणि मी माझ्या अस्तित्वात!

Baatcheet