
हसतो मी जगासाठी, आत मात्र मन रडतं, दिसायला शांत वाटतं, पण दुःख खोल दडतं.
ओठांवर हास्य असतं, डोळ्यांत मात्र पाणी, कोणीच वाचू शकत नाही, माझ्या मनातली कहाणी.
स्वप्नांना दिला जीव, विश्वास दिला खूप, ताऱ्यांनी उजेड दाखवला, दिला मात्र अंधार रूप.
रात्रीच्या शांततेत वेदना बोलू लागतात, न सांगितलेल्या शब्दांना हुंदके फुटू लागतात.
हिम्मत नव्हती माझ्यात तरी उभा राहिलो, हरलो किती हे मोजताना, मी खोलवर पाहिलो.
वेळेने नाही मोजली माझ्या जखमेची खोली हृदयावर उमटलेली वेदना मग स्वतःशीच बोलली काही जखमा अशा असतात, ज्या कधीच भरत नाहीत, शरीर झोपलेलं असतं, पण त्या झोपत नाहीत.
अश्रृंनी लिहिलेली ही आयुष्याची गाथा, हास्यात माझ्या लपली वेदनेचीच भाषा.
वेदना गुरू ठरल्या, शिकवून गेल्या मला, तुटल्या क्षणी कळली, माझी ओळख मला आजही हृदय दुखतं, तरी चालायला शिकतो, कारण तुटलेल्या मनातूनच खरी ताकद मी शोधतो.
:
1/2